धक्कादायक! शाळेच्या बाऊन्सरची पालकांना मारहाण

धक्कादायक! शाळेच्या बाऊन्सरची पालकांना मारहाण

पुणे | Pune

पुण्यातून एक धक्कादायक वृत्त समोर येत आहे. बिबवेवाडीतील (Bibvewadi) क्लाइन मेमोरियल स्कूलमध्ये महिला बाऊन्सरकडून (Bouncer) पालकांना मारहाण (Beaten) केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत एक व्हिडीओ समोर आला आहे...

मुलीची शाळेची फी (School fees) भरण्यावरून पालक आणि मुख्याध्यापक यांच्यात वाद झाला. फी भरण्याच्या वादावरून मुख्याध्यापकांनीच पालकांना मारहाण करण्यास सांगितल्याचा आरोप करण्यात आला आहे.

करोना (Corona) संकटामुळे फीबाबत शाळेने दिलासा द्यावा, यासाठी पालक निवेद्दन देण्यासाठी शाळेत गेले होते. मात्र मुख्याध्यापकांनी काहीही न ऐकता पालकांच्या अंगावर थेट बाउन्सरच सोडले, असे पालकांचे म्हणणे आहे.

धक्कादायक! शाळेच्या बाऊन्सरची पालकांना मारहाण
आता अनिल परबांचा नंबर; किरीट सोमय्यांनी शेअर केले 'ते' फोटोज

याप्रकरणी मयुरेश गायकवाड (Mayuresh Gaikwad) यांनी तक्रार दाखल केली आहे. बिबवेवाडी पोलीस ठाण्यात (Bibwewadi police station) अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com