विद्यापीठ अधिसभेचा आज निकाल

मतमोजणीला सकाळी साडेआठ पासून सुरुवात
विद्यापीठ अधिसभेचा आज निकाल

पुणे (प्रतिनिधी)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणूकीसाठी झालेल्या मतदानाच्या मतमोजणीला आज (दिनांक २२ नोव्हेंबर) सकाळी साडेआठ वाजता सुरुवात झाली. यंदा मागील वर्षीच्या तुलनेत मतदारांची संख्या दुप्पट असल्याने यंदा निकालाला अधिक वेळ लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेच्या दहा जागा पदवीधरांमधून निवडून देण्यासाठी विद्यापीठाकडून रविवार दिनांक २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले. याची मतमोजणी २२ नोव्हेंबर सकाळी साडेआठ वाजल्यापासून विद्यापीठातील खाशाबा जाधव क्रीडासंकुल येथे सुरू झाली आहे.

मतमोजणी ही सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या देखरेखीत होत आहे. यासाठी साधारण १७ हजार चौरसफूट अशा भव्य क्रीडा संकुलात ७२ काउंटर तयार करण्यात आले आहे. विद्यापीठातील जवळपास ३०० प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी या प्रक्रियेत सहभागी झाले आहेत. मतमोजणीचे आकडे दर काही वेळाने मोठ्या पडद्यावर जाहीर करण्यात येतील. 

मागील वेळी निकाल जाहीर होण्यासाठी पहाटेचे सहा वाजले होते या सर्व बाबी गृहीत धरून यंदा महिला आणि ज्येष्ठ कर्मचारी यांचा विचार करून व जास्तीत जास्त युवा कर्मचारी अधिकारी यात सहभागी केले आहेत. 

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com