पद्मश्री कै. भानू अथैया यांनी डिझाईन केलेल्या साड्या जतन करण्याची मागणी

- भाजप आमदार आशीष शेलार यांचे केंद्राला पत्र
पद्मश्री कै. भानू अथैया यांनी डिझाईन केलेल्या साड्या जतन करण्याची मागणी
USER

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

ऑस्कर विजेत्या भारतीय डिझायनर पद्मश्री दिवंगत भानू अथैया ( Oscar-winning Indian designer Padma Shri late Bhanu Athaiya )यांनी डिझाईन केलेल्या दोनशेहून अधिक साड्या आणि कपड्यांचा या महिन्यात लिलाव ( Auction of sarees and clothes ) होणार आहे. हा लिलाव थांबवून केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने हा ठेवा जतन करावा, अशी विनंती भाजप आमदार आशीष शेलार यांनी वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल ( Textile Minister Piyush Goyal ) यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

अथैया यांनी डिझाईन केलेली वस्त्रे हा महाराष्ट्र आणि भारतीय संस्कृतीचा समृद्ध वारसा असून त्याचे आपण जतन करणे आवश्यक आहे. जर एकदा लिलाव झाला की या वस्तू कदाचित परदेशी संग्रहालयात जातील. म्हणूनच वस्त्र मंत्रालयाने या वस्तू घ्याव्यात आणि मुंबईत होणाऱ्या वस्त्रोद्योग संग्रहालयाच्या एनआयएफटी उपकेंद्रात संग्रही ठेवाव्यात, अशी विनंती शेलार यांनी केली आहे.

तसेच या विभागाला पद्मश्री कै. भानू अथैया विभाग असे नाव देण्यात आले तर त्यांच्या कलेचा सन्मान होईल, अशी सूचनाही त्यांनी केली आहे. सुंदर फॅब्रिक डिझाइन आणि पारंपारिक भारतीय पोशाख हा भारतीय सिनेमाचा अविभाज्य भाग आहे. त्यादृष्टीने या वस्तू महत्वाच्या आहेत. म्हणून वस्त्रोद्योग मंत्रालयालाने याबाबत उचित कार्यवाही करावी, असे शेलार यांनी पत्रात म्हटले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com