
सातारा | Satara
साताऱ्याचे (Satara) राजकारण म्हटले तर खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांचे नाव सर्वात पुढे येते. मात्र उदयनराजे भोसले यांना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Elections) सावध भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीला उभे राहणार की नाही? असा प्रश्न विचारताच उदयनराजे भोसले यांनी याबाबत सूचक मौन बाळगले आहे.
सातारा शहरातील विकासकामांची पाहणी करताना माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या उत्तरामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे साताऱ्याचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांना भाजपकडून यावेळी लोकसभेचे तिकीट मिळेल याची खात्री वाटत नाही असे दिसत असल्याची चर्चा आहे. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सगळे आत्ताच उघड केले तर कसे होणार असे म्हटले आहे.
महायुतीमध्ये अजित पवारांच्या एन्ट्रीमुळे साताऱ्यातील राजकीय समीकरणे देखील बदलली आहेत. साताऱ्याच्या लोकसभेच्या जागेसाठी अजित पवार गट आग्रही असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सध्या राज्यसभेवर असलेल्या उदयनराजेंना भाजपकडून लोकसभेचे तिकीट मिळेल की नाही याबाबत खात्री नाही.
याविषयी पत्रकारांनी त्यांना विचारले असता, आताच सगळे उघड केले तर कसे होणार. लोकांचा आग्रह असतो. तो पण लक्षात घेतला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. उदयनराजे भोसले यांनी काल सातारा शहरातील विविध विकासकामांची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.