मुंबई | नेवासा| Mumbai

राज्य निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार राज्यातील ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सोडत कार्यक्रम आयोजित करणे बाकी असलेल्या

जिल्ह्यातील आरक्षण सोडत आता ग्रामपंचायत निवडणूकीनंतर म्हणजे 15 डिसेंबर 2020 नंतर होणार आहे.

राज्य निवडणूक आयोग सचिव यांनी दि.11 डिसेंबर रोजी याबाबद आदेश काढले आहेत.त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागचे उपसचिव ल.स.माळी यांनी ग्रामपंचायत निवडणूक असलेल्या सर्व जिल्हाधिकारी यांना याबाबदचे आदेश जारी केले आहेत.

त्यात त्यांनी म्हंटले आहे की, महाराष्ट्र ग्रामपंचायत ( सरपंच व उपसरपंच ) नियम 1964 च्या अनुषंगाने दि.5 मार्च 2020 रोजी राज्यस्तरीय सरपंच आरक्षण राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. त्यानुषंगाने राज्यातील काही जिल्ह्यात निवडणूक पुर्व सरपंच आरक्षण सोडत कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.

याबाबत असे कळविण्याचे मला निर्देश आहेत की , ज्या जिल्ह्यांमध्ये सरपंच आरक्षण सोडत कार्यक्रम आयोजित करणे बाकी असल्यास सदर कार्यक्रम हा संदर्भीय राज्य निवडणूक आयोगाच्या माहे एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या घोषित निवडणूक कार्यक्रमाच्या मतदानानंतर म्हणजेच दि.15 जानेवारी 2021 नंतर सरपंच आरक्षण सोडत कार्यक्रम राबविण्यात यावा.

या आदेशामुळे नगर जिल्ह्यातील 767 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षणाची सोडत पुढे ढकलली जाणार आहे.