संजय पांडे मुंबईचे नवे पोलिस आयुक्त

संजय पांडे मुंबईचे नवे पोलिस आयुक्त

मुंबई | Mumbai

मुंबईच्या पोलिस आयुक्त (Mumbai Commissioner of Police) पदी संजय पांडे (Sanjay Pandey) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सध्या या पदी असणाऱ्या हेमंत नगराळे यांची मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरुन बदली करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या जागी आता संजय पांडे हे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त असतील. थोड्याच वेळात संजय पांडे मुंबई पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारणार आहेत.

संजय पांडे यांनी यापूर्वी महाराष्ट्राच्या पोलिसांचं प्रमुखपद भूषवलं होतं. याआधी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदाची जबाबदारी यापूर्वी संजय पांडे यांच्याकडे होती. त्यांच्या जागी रजनीश शेठ यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे संजय पांडे यांच्याकडे आता मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

अशी आहे संजय पांडे यांची पोलीस सेवेतील कारकीर्द

आयआयटी कानपूरमधून आयटी कम्प्युटरमध्ये इंजिनीअरिंगचं शिक्षण

1986 च्या बॅचमधील IPS अधिकारी

सर्वात आधी पुण्यात सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून पुणे शहरात कामाला सुरुवात

मग मुंबईतील डीसीपी रँकचे अधिकारी बनले

1992 मुंबई दंगलीदरम्यान धारावीमध्ये दंगल नियंत्रण आणि सामाजिक एकोप्यासाठी पहिल्यांदा मोहल्ला समितीची स्थापना

1992-93 दंगलीच्या वेळी केलेल्या चांगल्या कार्याचा उल्लेख श्री कृष्णा आयोगाच्या अहवालात आहे

मुंबईत चार हायप्रोफाईल पोलीस स्टेशन मिळून झोन 8 बनवलं, याचे पहिले डीसीपी संजय पांडे बनले. जवळपास तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला

1993 मध्ये शिवसेना कार्यकर्त्यांच्या दादागिरीला लगाम लावला

1995 मध्ये नार्कोटिक्स विभागाचे डीसीपी म्हणून शहरातील ड्रग्ज रॅकेटला आळा घातला

1997 इकॉनॉमिक ऑफेन्स विंगमध्ये असताना अभ्युदय बँक घोटाळा, चमडा घोटाळ्याचा तपास करुन भ्रष्टाचाराचा उलगडा केला.

1998 मध्ये पुढील शिक्षणासाठी हॉवर्ड विद्यापीठात गेले, पदव्युत्तर शिक्षण घेतलं

1999 मध्ये SPG मध्ये असताना माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सुरक्षेत तैनात होते

2001 मध्ये राजीनामा दिला, परंतु तो मंजूर केला नाही, प्रकरण कोर्टात गेलं

2005 मध्ये सेवेत पुन्हा आले आणि कारकीर्दीतील 20 वर्षांच्या सेवेनंतर स्वेच्छानिवृत्तीची इच्छा व्यक्त केली, पण ती पूर्ण झाली नाही

कोर्टातील लढ्यानंतर 2011 मध्ये पुन्हे सेवेत रुजू झाले.

2014-15 लीगल मॅट्रोलॉजी डिपार्टमेंट कंट्रोलर मेजरमध्ये असताना बिल्डरांकडून फ्लॅट्सच्या कार्पेट एरियातील चोरी उघड केली. लोढा बिल्डरवर कारवाईही केली

2015 मध्ये होमगार्डचे अतिरिक्त पोलीस महासंचालक बनले आणि याच पदावर राहून महासंचालकही झाले.

अँटिलिया स्फोटक प्रकरणानंतर संजय पांडे यांच्या जागी परमबीर सिंह यांना नियुक्ती दिली. तर संजय पांडे यांना महाराष्ट्र राज्य सुरक्षा परिषदेत पाठवलं.

9 एप्रिल रोजी संजय पांडे यांना महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com