‘समृद्धी’ महामार्गावरील प्रवासासाठी 1213 रुपयांचा टोल

प्रतिकिलोमीटरसाठी टोल (31 मार्च 2025 पर्यंत)
‘समृद्धी’ महामार्गावरील प्रवासासाठी 1213 रुपयांचा टोल

मुंबई | Mumbai

राज्य शासनाचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला समृद्धी महामार्ग सर्वसामान्य प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरण्याची तसेच आर्थिक फटका देणारी असल्याचे संकेत मिळत आहेत. कारण या महामार्गावरून जायचं असेल तर नागपूर ते मुंबईत अशा 700 किलोमीटर अंतरासाठी 1,213 रुपये मोजावे लागणार आहेत. म्हणजे एका किलोमीटरसाठी सुमारे पावणेदोन रुपये द्यावे लागतील. त्यामुळं समृद्धी महामार्गावरुन जाताना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

‘समृद्धी’ महामार्गावरील प्रवासासाठी 1213 रुपयांचा टोल
श्वेता तिवारीच्या साडीवरील फोटोंवर चाहते म्हणाले...

समृद्धी महामार्गाचे काम बर्‍याच प्रमाणात झाले आहे. मुंबई ते नागपूर हा 701.480 किलोमीटर रस्ता आहे. या रस्त्यावर 26 टोल नाक्यांवर प्रवाशी तसेच मालवाहतूकदारांना टोल भरावा लागणार आहे. यासाठी टेंडरही निघाली आहेत. हा मार्ग नागपूर, वर्धा, अमरावती, वाशीम, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, नगर, नाशिक, ठाणे या दहा जिल्ह्यांतून जातो. तसेच चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, परभणी, नांदेड, बीड, धुळे, जळगाव, पालघर आणि रायगड या 143 जिल्ह्यांना याचा फायदा होणार आहे. मात्र, टोल सर्वसामान्यांना परवडणारा नाहीये. त्यामुळे या टोल दारावर नाराजी व्यक्त केली जात आहे.

नागपूरवरुन मुंबईला जाण्यासाठी 1,213 आणि परत येण्यासाठी एवढेच रुपये द्यावे लागणार आहे. त्यामुळं हे दर सर्वसामान्यांना नागरिकांना परवडणारे नसल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केलीये. दरम्यान, या टोलमुळे टोलनाकेचालक मालामाल होणार आहेत. परिणामी यासाठी मोठी रस्सीखेच पहावयास मिळण्याची शक्यता आहे.

* कार, जीप, व्हॅन किंवा हलकी वाहने - 1.73 रूपये

* माल वाहतुकीची वाहने किंवा मिनी बस - 2.79 रूपये

* ट्रक, बस (दोन आसांची) - 5.85 रूपये

* 3 आसांची व्यावसायिक वाहने - 6.38 रूपये

* चार किंवा सहा आसांची वाहने - 9.18 रूपये

* 7 किंवा जास्त आसांची वाहने - 11.17 रूपये

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com