
वाशिम । Washim
काही दिवसांपुर्वीच उदघाटन करण्यात आलेल्या समृद्धी महामार्गावर अपघातांचं सत्र सुरूच आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजाजवळ भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार वाशिम जिल्ह्यातील कारंजा परिसरातील समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. यामध्ये दोन जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतकांमध्ये एक महिला आणि एका लहान मुलीचा समावेश आहे. नागपुरच्या दिशेने जाणारी कार पलटी होऊन हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प समृद्धी महामार्गाचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. या महामार्गाचं लोकार्पण झाल्यापासूनच या महामार्गावर अनेक अपघात होत आहेत. त्यामुळे हा समृद्धी महामार्ग हा अपघातांचा महामार्ग झाला आहे का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
समृद्धी महामार्गाची वैशिष्टये -
• लांबी ७०१ किमी
• एकूण जमीन : ८३११ हेक्टर
• रुंदी : १२० मीटर
• इंटरवेज : २४
• अंडरपासेस : ७००
• उड्डाणपूल : ६५
• लहान पूल : २९४
• वे साईड अमॅनेटीझ : ३२
• रेल्वे ओव्हरब्रीज : ८
• द्रुतगती मार्गावरील वाहनांची वेगमर्यादा ताशी : १५० किमी (डिझाइन स्पीड)
• द्रुतगती मार्गाच्या दुतर्फा झाडांची संख्या : साडे बारा लक्ष
• कृषी समृद्धी केंद्रे : १८ एकूण गावांची संख्या : ३९२
• प्रकल्पाचा अंदाजित खर्च: ५५ हजार कोटी रुपये
• एकूण लाभार्थी : २३ हजार ५००
• वितरित झालेला मोबदला : ६ हजार ६०० कोटी रुपये
• कौशल्य विकास प्रशिक्षणाचे लाभार्थी : ३५६
• द्रुतगती मार्गालगत सीएनजी/ पीएनजी गॅस वाहिनी : गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया मार्फत
• ऑप्टिकल फायबर नेटवर्कचे जाळे