Sachin Vaze : खंडणी प्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना जामीन मंजूर

Sachin Vaze : खंडणी प्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना जामीन मंजूर

मुंबई | Mumbai

खंडणी प्रकरणात जेलमध्ये असलेल्या सचिन वाझेला जामीन मंजूर झाला आहे. सीबीआय तपास करत असलेल्या प्रकरणात हा जामीन मंजूर झाला. मागच्याच आठवड्यात मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझेचा जामीन अर्ज एनआयए कोर्टाने फेटाळून लावला होता. आज त्याला सीबीआयच्या प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे.

दोन वर्षांपूर्वी गाजलेलं अँटिलिया प्रकरण फारच गुंतागुंतीचं झालं होतं. 25 फेब्रुवारी 2021 रोजी, मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या घराबाहेर एक महिंद्रा स्कॉर्पिओ आढळली होती. ज्यामध्ये तब्बल 20 जिलेटिनच्या कांड्या असलेली बॅग आढळून आली होती. त्यानंतर एकच खळबळ उडाली. या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह 5 मार्च रोजी मुंब्राजवळील खाडीत सापडला होता. प्रकरणाचे धागेदोरे सचिन वाझे याच्यापर्यंत येऊन ठेपले होते. या प्रकरणात वाझेवर कथित शंभर कोटी रुपयांच्या खंडणीची केसदेखील सुरु. सीबीआय तपास करत असलेल्या प्रकरणामध्ये आज वाझेला जामीन मंजूर झाला आहे.

Sachin Vaze : खंडणी प्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना जामीन मंजूर
Gautami Patil : गौतमी पाटीलवर नगरमध्ये गुन्हा दाखल; काय आहे कारण?

100 कोटी खंडणी प्रकरणात माफीचा साक्षीदार

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याविरोधातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणात माफिचा साक्षीदार बनलेल्या सचिन वाझेची (Sachin Vaze) जेलमधून सुटका करण्याची मागणी मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळून लावली. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश एस.एच. गवलानी यांच्यापुढे वाझेच्या जामीन अर्जावर एप्रिलमध्ये सुनावणी झाली होती. अनिल देशमुख यांच्या आदेशानुसार मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटकडून पैसे गोळा केल्याचं सचिन वाझेने तपासादरम्यान सांगितलं होतं.

सचिन वाझेनं या प्रकरणात माफिचा साक्षीदार होण्याकरता तयारी दर्शवली होती. त्याला सीबीआयनं ना हरकत दिल्यावर कोर्टानंही मान्यता दिलेली आहे. याच पार्श्वभूमीवर जर आपण कारागृहात राहिलो तर मग माफिचा साक्षीदार होण्याचा उद्देश नष्ट होऊ शकतो, असा युक्तिवाद वाझेकडून या अर्जाद्वारे कोर्टाकडे करण्यात आला होता.

Sachin Vaze : खंडणी प्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना जामीन मंजूर
प्रसिद्ध अभिनेत्याकडून सेन्सॉर बोर्डातील भ्रष्टाचाराची पोलखोल; एकनाथ शिंदेंना टॅग करत म्हणाला, “चित्रपटासाठी ६.५ लाख...”,
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com