सचिन वाझे याची पोलीस दलातून हकालपट्टी

सचिन वाझे याची पोलीस दलातून हकालपट्टी
सचिन वाझेSachin Waze

मुंबई -

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्याजवळ स्कॉर्पिओ गाडीमध्ये स्फोटके ठेवल्याप्रकरणी आणि स्कॉर्पिओ गाडीचा मालक मनसुख हिरेन हत्येप्रकरणी एनआयएच्या अटकेत असलेला सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे याची अखेर पोलिस खात्यातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्याला खात्यातून बडतर्फ केल्याचे आदेश मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी आज मंगळवारी जारी केले आहे.

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थाना समोर जिलेटीनने भरलेली स्कॉर्पियो कार 25 फेब्रुवारी रोजी सापडली होती. त्यानंतर 4 मार्च रोजी कारचा मालक मनसुख हिरेन याची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी एनआयए ने या दोन्ही गुन्हयातील प्रमुख आरोपी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे याला अटक केली होती. सचिन वाझेच्या कारनाम्यानंतर मुंबई पोलीस विशेष शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त कोल्हे यांनी सचिन वाझेे याला पोलीस दलातून निलंबित केले होते. सचिन वाझे याने रचलेल्या कटात पोलीस शिपाई विनायक शिंदे, पोलीस निरीक्षक सुनील माने आणि सपोनि रियाझुद्दीन काझी यां देखील सामील केले होते. सचिन वाझे यांच्यासह पोलीस शिपाई विनायक शिंदे, पोलीस निरीक्षक सुनील माने आणि सपोनि रियाझुद्दीन काझी या तिघांना देखील एनआयए ने अटक केली आहे. सध्या हे सर्व न्यायालयीन कोठडीत तळोजा तुरुंगात आहे.

मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी भारतीय संविधान कलम 311 (2) (ब ) तरतुदीनुसार मंगळवारी सचिन वाझेे याला पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले असल्याचे आदेश जारी केले आहे. सचिन वाझेे याला ख्वाजा युनूस प्रकरणात अटक करण्यात आली होती, त्या वेळी त्याला निलंबित करण्यात आले होते. 16 वर्षे पोलीस खात्यातून बाहेर राहिल्यानंतर सचिन वाझेला 10 महिन्यापूर्वीच पोलीस दलात घेण्यात आले होते. त्यानंतर त्याच्याकडे मुंबई गुन्हे शाखेच्या सीआययु प्रमुख म्हणून जवाबदारी देण्यात आली होती. आता वाझेेला पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आलं आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com