तब्ब्ल 57 तरूणींसोबत प्रेमाचे नाटक करुन 53 लाखांना गंडा ; भामटा जेरबंद

तरूणींच्या नातलगांना सैन्यात भरती करण्याचे आमिष दाखवून उकळले पैसे
तब्ब्ल 57 तरूणींसोबत प्रेमाचे नाटक करुन 53 लाखांना गंडा ; भामटा जेरबंद

पुणे / Pune - सोशल मीडियाद्वारे (Social Media) तरूणींना प्रेमाच्या (Love) जाळ्यात ओढून तरूणींच्या नातलग तरूणांना सैन्यात भरती करण्याच्या आमिषाने तब्बल 57 जणींना गंडा घालणार्‍या भामट्याला बिबवेवाडी पोलिसांनी (Bibwewadi Police) अटक केली आहे. योगेश दत्तू गायकवाड (रा. कन्नड, संभाजीनगर) असे अटक केलेल्या भामट्याचे नाव आहे.

योगेशने चार जणींसोबत विवाह करून तब्बल 53 तरूणींसोबत लग्नाच्या आमिषाने बोलणी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याद्वारे त्याने आतापर्यंत 53 लाखांची फसवणूक केली आहे. त्याचा साथीदार संजय ज्ञानबा शिंदे (वय ३८, रा. केडगाव ता.जि.अहमदनगर) यालाही अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी एका तरूणीने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. फिर्यादी तरूणी मूळची आळंदी (देवाची) येथे राहत असून जानेवारी 2020 मध्ये आईच्या उपचारासाठी बिबवेवाडीतील एका रूग्णालयात आली होती. त्यावेळी परिसरातील स्थानकावर बसची वाट पाहत असताना आरोपी योगेशचे आधारकार्ड त्याच्या पँटच्या खिशातून पडलेले तरुणीने पाहिले. त्यावेळी तिने आवाज देत योगेशला आधार कार्ड दिले.

त्यानंतर त्याने फिर्यादी तरूणी आणि तिच्या आईसोबत ओळख वाढविली. लष्करामध्ये असल्याचे खोटे ओळखपत्र दाखवून तरूणीच्या आईचा विश्‍वास संपादित केला. त्यानंतर तरूणीसोबत खोटे लग्न करून तिच्या भावाला लष्करात भरती करण्यासाठी 2 लाख रूपये घेतले. अशा पद्धतीने योगेशने इतर तरूणींनाही गंडा घातला आहे.

त्याला सापळा रचून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील झावरे, पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर, एपीआय राजेश उसगावकर, अमित पुजारी, सतीश मोरे, तानाजी सागर, श्रीकांत कुलकर्णी, अतुल महांगडे, अमोल शितोळे, दीपक लोधा, राहूल कोठावळे यांच्या पथकाने केली.

तब्ब्ल 57 तरूणींसोबत प्रेमाचे नाटक करुन 53 लाखांना गंडा ; भामटा जेरबंद
सावधान ! सैन्यात नोकरीच्या आमिषाने तरुणांना 60 लाखांना गंडा

अशी केली फसवणूक

आरोपी योगेश मूळचा कन्नड तालुक्यातील असून, पुण्यातील विविध भागांत तो फिरत होता. बसस्थानकावर एकट्या तरुणींना गाठून विश्‍वास वाढवून मोबाईल नंबर घेत होता. त्याशिवाय सोशल मीडिया, विविध अ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्रामद्वारे ओळख वाढवून तरुणींना लग्नाचे आमिष दाखवित होता. त्यांच्या कुटुंबातील मुलाला सैन्यात भरती करण्याच्या आमिषाने 2 ते 3 लाख रुपये घेऊन पोबरा करीत होता. अशाप्रकारे त्याने 4 जणींसोबत घरोबा करून आर्थिंक गंडा घातला आहे. त्याशिवाय 53 जणींसोबत प्रेमाचे नाटक करून त्यांच्याकडून पैसे उकळले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com