मुख्यमंत्री-पंतप्रधान भेटीवर रोहित पवारांचे ट्विट, म्हणाले...

मुख्यमंत्री-पंतप्रधान भेटीवर रोहित पवारांचे ट्विट, म्हणाले...

मुंबई - मराठा आरक्षणासह इतर प्रश्‍नांच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज दिल्लीत बैठक झाली. यमुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे होते. मोदींसमवेतच्या या दिल्ली भेटीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. अजित पवार यांनी सूट परिधान केला असून त्याचीही सोशल मीडियात चर्चा आहे.

अनेकांनी विविध कॅप्शनसह हे फोटो शेअर केले आहेत. राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांनीही या फोटोला भन्नाट कॅप्शन दिले आहे. रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हा फोटो शेअर करत, ‘लोकशाहीचं सौदर्य’ असं कॅप्शन दिलं. रोहित पवार यांनी दिलेलं हे कॅप्शन अनेकांना आवडलं असून अनेेकांनी त्यावर कमेंट करुन आपलं मत व्यक्त केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com