पुण्यात म्युकर मायकोसीसचा वाढता प्रादुर्भाव

पुण्यात म्युकर मायकोसीसचा वाढता प्रादुर्भाव

1 जूनपासून पुणे महापालिका करणार घरोघरी जाऊन कोरोनामुक्त रुग्णांचे सर्वेक्षण

पुणे (प्रतिनिधि) - करोना बरोबरच म्युकरमायकोसीसचे हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यामध्ये आता पुणे महापालिकेने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. येत्या एक जूनपासून पुण्यात घरोघरी जाऊन कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरुक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी ही माहिती दिली.

गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये म्युकोरमायकोसीसच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत या आजाराचे तब्बल ६२० रुग्ण आढळून आले असून, म्युकरमायकोसिसच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद जिल्ह्यात झाली आहे.

या आजारामुळे जिल्ह्यात आतापर्यंत २७ मृत्यू झाले आहेत. तर अनेक रुग्णांनी आपली दृष्टी गमवाली आहे. पुणे जिल्ह्यात पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण क्षेत्रात आतापर्यंत ६२० रुग्ण आढळून आले आले आहेत. यातील ५६४ रुग्णांवर वेगवेगळ्या सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत २९ जण या आजारातून बरे झाले आहेत.

दरम्यान, आणखी मृत्यू रोखणे व रुग्णांना वेळेत उपचार देण्यासाठी महापालिकेने ही शोधमोहीम सुरू केली असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितले आहे. दरम्यान, आत्तापर्यंत महापालिकेने दोन हजार कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांशी संपर्क साधून या आजाराविषयीच्या लक्षणांची विचारपूस केली आहे. मात्र, यामध्ये ही लक्षणे असलेल्यांचे प्रमाण नगण्य असल्याचे सध्यातरी आढळून आले आहे.

गेल्या पाच दिवसात जिल्ह्यात म्युकरमायकोसिससाठी 2860 इंजेक्शनचे वाटप करण्यात आले आहेत. म्युकरमायकोसिसचे बाहेरील जिल्ह्यातील 19 रुग्ण सध्या पुण्यात उपचार घेत असल्याची माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली आहे.

१ एप्रिलपासून कोरोनामुक्त झालेल्या सर्व रुग्णांना महापालिकेकडून फोन करून, त्यांना म्युकरमायकोसिस आजाराची कोणती लक्षणे आहेत का? महापालिकेच्या वॉर रूममधून या रुग्णांशी संपर्क साधून या आजाराची कोणती लक्षणे आहेत का? याची विचारणा करण्यात येत आहे.

या आजारासंबंधित लक्षणे असलेल्या रुग्णांना, महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात बोलावून कान, नाक, घसा व नेत्र यांच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी केली जात आहे. त्यासाठी कमला नेहरू रुग्णालयात बाह्य रुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे. तर सर्वेक्षणादरम्यान कुणी म्युकरमायकोसिसची लागण झालेल्या रुग्ण आढळल्यास त्याच्यावर दळवी रुग्णालयात उपचार केले जाणार आहे. त्यासाठी दळवी रुग्णालयात स्वतंत्र वॉर्डही तयार करण्यात आला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com