पुण्यातील निर्बंध सोमवारपासून आणखी शिथिल होणार

पुण्यातील निर्बंध सोमवारपासून आणखी शिथिल होणार
पुणे

पुणे (प्रतिनिधि) - पुण्यातील पॉझिटिव्हिटी रेट पाचच्या खाली आल्यामुळे पुण्यातील निर्बंध आणखी शिथिल करण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कोरोना आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाप्रमाणे सोमवारपासून (दि.14 जून ) पुण्यातील मॉल्स उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे तर सर्व दुकाने रात्री सात वाजेपर्यंत खुली राहतील. याशिवाय सोमवारपासून अभ्यासिका, वाचनालय सुरु करण्यास देखील परवानगी देण्यात आली आहे.

पुण्यातील कौन्सिल हॉल येथे अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक पार पडली. या बैठकीला प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. शहर अनलॉक केल्यानंतर ही पहिली बैठक होती. रुग्ण संख्येची परिस्थिती बघून आणखी शिथिलता देणार की निर्बंध कठोर केले जाणार याकडे लक्ष लागले होते. या बैठकीनंतर पुणेकरांच्या निर्बंधांमध्ये आणखी शिथिलता देण्यात आली आहे.

काय आणि कधी उघडे राहणार

दुकाने सकाळी 7 ते संध्याकाळी 7

हॉटेल्स सकाळी 7 ते रात्री 10

पार्सल रात्री 11 पर्यंत

अत्यावश्यक सुविधा वगळता इतर दुकाने शनिवारी ,रविवारी बंद

संचारबंदी रात्री 10 पासून

उद्याने सकाळी 5 ते 9 आणि संध्याकाळी 4 ते 7

आऊटडोअर स्पोर्ट्स ,क्रीडांगणे सकाळी 5 ते 9 आणि संध्याकाळी 5 ते 7

अभ्यासिका, वाचनालये 50 टक्के क्षमतेने संध्याकाळी 7 पर्यंत

राजकीय,सामाजिक ,सांस्कृतिक कार्यक्रम 50 लोकांसह संध्याकाळी 7 वाजे पर्यंत

लेव्हल 5 असलेल्या ठिकाणी जायचं तर ई पास आवश्यक

शासकीय कार्यालये 100 टक्के क्षमतेने सुरू राहणार

खाजगी कार्यालये 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com