आरोग्यमंत्री राजेश टोपे
आरोग्यमंत्री राजेश टोपे
महाराष्ट्र

‘श्‍वसन’आजारांवर मोफत उपचार

पैसे घेतल्यास रुग्णालयांना पाचपट दंड

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

मुंबई |Mumbai -

महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत श्‍वसन प्रकारातील 20 आजारांवर मोफत उपचार करावेत असा विशेष आदेश राज्य सरकारने जारी केला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली. Respiratory diseases Free treatment

ते म्हणाले, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेबाबत सरकारकडून विशेष आदेश जारी करण्यात आले आहेत. यामध्ये श्‍वसनासंदर्भातील 20 आजारांसाठी मोफत उपचार करावेत. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतील रूग्णालयांनी हे उपचार मोफत करावे.

मात्र जर या उपचारांसाठी पैसे घेतले तर पाचपट दंड आकारण्याचा त्याचप्रमाणे परवाना रद्द करण्याचा अधिकार जिल्ह्याधिकार्‍यांना देण्यात आला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com