रिपब्लिक टीव्ही पोलीस आयुक्त सिंग यांच्याविरोधात करणार 200 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा

टीआरपी घोटाळा प्रकरण
रिपब्लिक टीव्ही पोलीस आयुक्त सिंग यांच्याविरोधात करणार 200 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा

मुंबई -

टीआरपी घोटाळा प्रकरणी रिपब्लिक टीव्ही मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात 200 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा

करणार आहे.

टीआरपी घोटाळा प्रकरणी रिपब्लिक टीव्ही विरोधातील एफआयआर रद्द करण्याबाबतच्या याचिकेवर सोमवारी मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. यावेळी कोर्टात मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारच्या वकिलांनी टीआरपी घोटाळ्यातील एफआयआरमध्ये रिपब्लिक टीव्हीचे नाव नसल्याचे म्हटले. त्यानंतर रिपब्लिक टीव्हीच्यावतीने मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात 200 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. याबाबत रिपब्लिक मीडिया नेटवर्कने पत्रक काढून याबाबत माहिती दिली आहे.

पत्रकानुसार, नेटवर्कच्यावतीनं त्यांची लीगल टीमला मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात 200 कोटी रुपयांचा दावा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये रिपब्लिकच्या संपादकांच्या अब्रू नुकसानी विरोधात 100 कोटी आणि रिपब्लिक मीडिया नेटवर्कच्या नुकसानीला कारणीभूत ठरल्याप्रकरणी 100 कोटी रुपयांचा समावेश आहे.

स्वतःच्या आयुक्तांविरोधात मुंबई पोलिसांनी आणि महाराष्ट्र सरकारच्या वकिलांनी सोमवारी हायकोर्टात टीआरपी प्रकरणातील एफआयआरमध्ये रिपब्लिक टीव्हीचे नाव नसल्याचे सांगितले. याद्वारे त्यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला, असे रिपब्लिकच्या पत्रकात म्हटले आहे.

अधिकाधिक जाहिराती पदरी पाडून घेण्यासाठी कृत्रिमरीत्या टीआरपी (टेलिव्हीजन रेटिंग पॉइंट) वाढवणार्‍या वाहिन्यांचे बिंग फोडल्याचा दावा या महिन्याच्या सुरुवातीला मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. हा आर्थिक घोटाळा असून त्यात रिपब्लिक या वृत्तवाहिनीसह फक्त मराठी, बॉक्स सिनेमा आदी वाहिन्यांचा सहभाग पुढे आल्याचेही त्यांनी म्हटले होते.

दरम्यान, रिपब्लिक टिव्हीचा यात सहभाग नसल्याचा दावा करीत या नेटवर्कने एफआयआरमधून आपले नाव वगळण्यात यावे यासाठी हायकोर्टात धाव घेतली होती. यावर सोमवारी मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com