परमबीर सिंग यांना उच्च न्यायालयाचा दिलासा
परमबीर सिंग

परमबीर सिंग यांना उच्च न्यायालयाचा दिलासा

काय आहे प्रकरण?

मुंबई | Mumbai

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि महाराष्ट्र होमगार्डचे महासंचालक परमबीर सिंग (Param Bir Singh) यांना मुंबई उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिला आहे.

पोलिस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी परमबीर सिंग यांच्याविरोधात अ‍ॅट्रोसिटीच्या गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी येत्या ९ जून पर्यंत सिंग यांना अटक केली जाणार नाही, असी ग्वाही राज्य सरकारच्या वतीनं उच्च न्यायालयाने दिली आहे. तोपर्यंत सिंग यांनी तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य करावे, अशी विनंतीही राज्य सरकारने उच्च न्यायालयात केली आहे. दरम्यान आता न्यायालयाच्या उन्हाळी सुट्ट्या असल्याने त्या संपल्यानंतर १५ दिवसांच्या ब्रेकने या प्रकरणाची पुढील कारवाई सुरू केली जाईल असं देखील सांगण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण?

पोलिस इन्स्पेक्टर भीमराव घाडगे यांनी परमबीर सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या आरोपानुसार, परमबीर सिंह यांनी आपल्याला मानहानीकारक वागणूक दिली, त्यांच्याविरोधात खोटे गुन्हे दाखल केले, आणि जातीवाचक शिवीगाळ करत मानसिक छळ केला. दरम्यान सिंह यांनी हे आरोप फेटाळून लावत गुन्हा रद्द करण्यासाठी कोर्टात धाव घेतली आहे. ही तक्रार २०१५ ची असून आता त्यावर गुन्हा दाखल होत असल्याने अनेक उलट सुलट चर्चांना उधाण आलं आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com