राज्यात 75 हजार जागांच्या भरतीला सुरुवात : फडणवीस

पोलिसांच्या 18 हजार पदांसाठी आठवडाभरात जाहिरात
राज्यात 75 हजार जागांच्या भरतीला सुरुवात : फडणवीस

मुंबई | Mumbai

महाराष्ट्रात वर्षभरात 75 हजार नोकऱ्या देण्याचा निश्चय सरकारचा आहे. त्याची सुरुवात आजपासून झाली. 2 हजार जणांना नियुक्तीपत्र देण्यात आले. हे आकडे पुढे वाढत जातील. पण हा शेवटचा अटेम्प्ट किंवा शेवटची संधी समजू नका, कोर्टात जाऊन जागा अडवू नका किंवा स्थगिती आणू नका, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले...

शिंदे सरकारने महाराष्ट्रात वर्षभरात 75 हजार रोजगार देण्याचा निश्चय केला आहे. या महासंकल्प रोजगार मेळाव्याची सुरुवात आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाली. आज दोन हजार जणांना नियुक्तीपत्र देण्यात आली.

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यातील तरुणांच्या रोजगाराच्या पूर्ततेची सुरुवात राज्य सरकारने केली आहे. केंद्र सरकार आपल्या केंद्रीय विभागात 10 लाख नोकऱ्या देणार आहे. राज्यानेही आपल्या राज्यात तरुण तरुणींना रोजगार द्याव्यात. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सूचना केल्यानंतर पहिले राज्य महाराष्ट्र ठरले आहे.

राज्यात 75 हजार जागांच्या भरतीला सुरुवात : फडणवीस
नाशिक : फर्निचर गोदामाला भीषण आग, लाखोंचे नुकसान

देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकार 75 हजार जागा भरणार आहे. शासकीय नोकरीत अघोषित बंदी आहे ती संपवावी असा निर्धार सरकारने केला आहे, असे त्यांनी सांगितले.

राज्यात 75 हजार जागांच्या भरतीला सुरुवात : फडणवीस
Video : धकाधकीच्या जीवनात शांतता पाहिजे? सुरगाण्यातील 'या' ठिकाणी एकदा भेट द्याच

येत्या काळात साडे 18 हजार पोलीस भरतीची जाहिरात काढत आहोत. ग्राम विकास विभागतदेखील आपण काही पदे भरणार आहोत. मागच्या काळात जे घोटाळा पाहायला मिळाले तसे होणार नाही. देशात ज्या बेस्ट एजन्सी आहेत त्यांना काम देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com