राज्यात आज पुन्हा लसीकरणाचा विक्रम

चार कोटींचा टप्पा पार
राज्यात आज पुन्हा लसीकरणाचा विक्रम

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

करोना प्रतिबंधात्मक लसीकरणात( Corona Vaccination ) राज्याने ( Maharashtra State ) मंगळवारी पुन्हा विक्रम प्रस्थापित करीत लस मात्रांचा चार कोटींचा टप्पा पार केला.

आज दुपारपर्यंत झालेल्या लसीकरणानंतर आतापर्यंत ४ कोटी २४ हजार ७०१ लसींचे डोस देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ.प्रदिप व्यास यांनी आज दिली.

देशामध्ये करोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्र आघाडीवर असून आज दुपारी दोन वाजेपर्यंत झालेल्या लसीकरणानंतर राज्याने आतापर्यंत दिलेल्या एकूण डोसेसची संख्या चार कोटींवर गेली.

त्यामध्ये पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ३ कोटी ६ लाख ९९ हजार ३३९ तर दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या ९३ लाख २५ हजार ३६२ एवढी आहे. आज दुपारपर्यंत राज्यात १ लाख २० हजार नागरिकांना लस देण्यात आली आहे . सायंकाळपर्यंत हा आकडा वाढू शकेल, असे डॉ.व्यास यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com