दोन हजारांच्या नोटा बदलून घेण्यासाठी आजची शेवटची संधी; नाहीतर...

दोन हजारांच्या नोटा बदलून घेण्यासाठी आजची शेवटची संधी; नाहीतर...

नवी दिल्ली | New Delhi

तुमच्याकडे २००० रुपयांची नोट असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. रिझर्व्ह बँकेने ठरवून दिलेली मुदत आज शनिवारी संपत आहे. २००० रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या घोषणेबरोबरच भारतीय रिझर्व्ह बँकेने त्या नोटा बँका आणि आरबीआयच्या १९ प्रादेशिक कार्यालयांमध्ये जमा करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी आज ३० सप्टेंबरची अंतिम मुदत दिली आहे.

मे महिन्यात सरकारने २००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली होती. या नोटा बँकांमध्ये जमा करण्यासाठी आणि बदलण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, हा आदेश लागू झाल्यानंतर १५ दिवसांतच बहुतांश लोकांनी नोटा बदलून घेतल्या.

जर तुम्ही आजपर्यंत नोटा बदलल्या नाहीत तर उद्यापासून त्यांची किंमत कागदाच्या तुकड्यासारखी होईल. मिंटच्या अहवालात असे म्हटले आहे की, रिझर्व्ह बँकेने हे स्पष्ट केले आहे की ती २००० रुपयांच्या नोटा बदलण्याची अंतिम मुदत वाढवणार नाही. अशा परिस्थितीत तुमच्याकडे २००० रुपयांच्या नोटा बदलण्याची शेवटची संधी आहे.

दोन हजारांच्या नोटा बदलून घेण्यासाठी आजची शेवटची संधी; नाहीतर...
बिग बॉस फेम अर्चना गौतमला काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मारहाण? व्हिडिओ झाला व्हायरल

दरम्यान, RBI ने दिलेल्या माहितीनुसार, ३१ मार्च २०२३ पर्यंत २००० रुपयांच्या ३.६२ लाख कोटी रुपयांच्या नोटा चलनात होत्या. ज्या १९ मे २०२३ रोजी ३.५६ लाख कोटी रुपयांवर आल्या होत्या. गेल्यावेळी,१ सप्टेंबर २०२३ रोजी, RBI ने नोटा परत करण्याबाबत डेटा जारी केला होता, त्यानुसार ३.३२ लाख कोटी रुपयांच्या २००० च्या नोटा बँकिंग सिस्टममध्ये परत आल्या होत्या.

कशा बदलाल २००० च्या नोटा

जर तुमच्याकडे २०००ची नोट असेल तर तुम्ही तुमची नोट बँकेत जमा किंवा बदलू शकता. तुम्ही दिवसाला फक्त २० हजार रुपये जमा करू शकतात. २००० रुपयांच्या नोटा बदलून देण्याची किंवा जमा करण्याची प्रक्रिया २३ मेपासून बँकांकडून सुरू झाली होती.

केवायसी नियम आणि इतर कायदेशीर प्रक्रियांद्वारे लोक बँकांमध्ये २००० रुपयांच्या नोटा जमा किंवा बदलू शकतात. यामध्ये सप्टेंबर महिन्यापर्यंत २००० रुपयांच्या सुमारे ९३ टक्के नोटा परत आल्या आहेत. अशा परिस्थितीत आता २००० रुपयांच्या काही नोटाच चलनात असतील असा अंदाज सेंट्रल बँकेने व्यक्त केला आहे.

दोन हजारांच्या नोटा बदलून घेण्यासाठी आजची शेवटची संधी; नाहीतर...
Rahul Narvekar : मुख्यमंत्र्यांनंतर विधानसभा अध्यक्षांचा परदेश दौरा रद्द, ठाकरे गटाची चाल यशस्वी?

म्हणून २००० च्या नोटा बदलण्याचा निर्णय घेतला

२००० रुपये मूल्याची नोट नोव्हेंबर २०१६ मध्ये जारी करण्यात आली. त्या वेळी चलनात असलेल्या सर्व ५०० रुपये आणि १००० रुपयांच्या नोटा एका झटक्यात चलनातून रद्द करण्यात आल्या होत्या. त्यावेळी बाजारातील चलनाची मागणी पूर्ण करण्यासाठी २००० रुपयांची नोट जारी करण्यात आली होती.

दरम्यान, गेल्या काही काळापासून सामान्य व्यवहारांसाठी दोन हजार रुपयांची नोट वापरली जात नसल्याची बाब समोर आली होती. त्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या “क्लीन नोट पॉलिसी” च्या अनुषंगाने, २००० रुपये मूल्याच्या बँक नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com