वडिलांवर चोरीचा गुन्हा दाखल झाल्याने युवकाची आत्महत्या
महाराष्ट्र

वडिलांवर चोरीचा गुन्हा दाखल झाल्याने युवकाची आत्महत्या

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

रावेर  –

येथील कुंभारवाड्यातील रहिवासी असलेल्या युवकाने वडिलांवर चोरीचा गुन्हा दाखल झाल्याने समाजात बदनामी होईल या भीतीने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी 5 वाजेच्या सुमारास घडली. याबाबत युवकाच्या आत्महत्येप्रकरणी रेल्वे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

येथील भोरजवळील रेल्वेगेटजवळ मयूर प्रजापती (वय 20) याने डाऊन लाईनवर जीवनयात्रा संपवली. दुपारी त्यांचे वडील रवींद्र नारायण कुंभार यांच्यावर रावेर पोलिसांत एका घरात घरफोडी केल्याचा गुन्हा नोंदला गेल्याने, यामुळे समाजात बदनामी होईल, अशा भीतीपोटी त्याने आत्महत्या केल्याची चर्चा रावेरात सुरु आहे. दरम्यान रात्री उशिरापर्यंत रावेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Deshdoot
www.deshdoot.com