सावधान! उत्पन्न वाढूनही रेशनधान्य घेताय? मग 'ही' बातमी तुमच्यासाठी

सावधान! उत्पन्न वाढूनही रेशनधान्य घेताय? मग 'ही' बातमी तुमच्यासाठी

मुंबई | Mumbai

रेशनकार्ड धारकांसाठी (Ration card holders) एक महत्वाची बातमी समोर येत आहे. ज्या रेशन कार्डधारकांचे उत्पन्न (Income) वाढले आहे मात्र ते अद्याप रेशनधान्य घेत आहेत, अशा धारकांचे धान्य आता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे....

येत्या ०१ सप्टेंबरपासून शिधापत्रिकांची पडताळणी होणार आहे. कौटुंबिक परिस्थिती सुधारूनही अनेकजण जुन्या रेशनकार्डचा वापर करत वर्षानुवर्षे स्वस्त किमतीत धान्य घेतात. अनेक जण स्वस्तातील रेशनधान्य घेऊन ते खासगी व्यक्तींना विकतात त्यामुळे जे गरजू आहेत त्यांना हे धान्य उपलब्ध होऊ शकत नाही.

दि. ०१ सप्टेंबरपासून धान्य निरीक्षकांमार्फत गावोगावी प्रत्येक शिधापत्रिकाधारकांची पडताळणी सुरू होईल. वेळप्रसंगी संबंधितांवर फौजदारी कारवाई केली जाणार आहे. खोट्या माहितीद्वारे शासनाची फसवणूक केली म्हणून त्यांच्याकडून मागील धान्याची वसुलीदेखील केली जाणार असल्याचे समजते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com