मुंबई -

रेशनकार्डधारकांकडे दुचाकी, चारचाकी वाहन असले तर रेशनकार्ड रद्द होणार आहे. इतकेच नाहीतर तुमच्या शेतीचे उत्पन्न वाढले तरी

देखील तुमचे रेशन कार्ड रद्द होईल. राज्य सरकारच्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे जवळपास लाखांपेक्षा अधिक लोकांचे रेशनकार्ड रद्द होण्याची शक्यता आहे.

रेशनकार्ड लाभार्थ्यांना शहरातील उत्पन्नाची अट 59 हजार रूपये आहे. तर ग्रामीण भागात ही अट 44 हजार रूपये आहे. म्हणूनच सरकार दुचाकी किंवा चारचाकी वापरणार्यांना श्रीमंत समजून त्यांना रेशन दुकानातून धान्य देणार नाही. सरकार नव्या गरजू लाभार्थ्यांना रेशनकार्ड देणार आहे.

सरकारच्या या नव्या निर्णयानुसार रेशनकार्ड धारकांकडून माहिती लिहून घेतली जाणार आहे. यात देण्यात आलेल्या निकषांनुसार दुचाकी, चारचाकी आणि शेतीत अधिक उत्पन्न असलेल्यांची माहिती गोळा करण्याचे काम प्रत्येक जिल्ह्यात सुरू आहे. हे काम अन्न आणि पुरवठा विभागाकडून करण्यात येत आहे. तुमच्याकडे असलेल्या वाहनांची तपासणी आरटीओकडून करण्यात येत आहे. तर महसूल विभाग महसूल विभागाकडून शेतीतील उत्पन्नाची