लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे(प्रतिनिधि)

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी पुणे वाहतूक शाखेतील पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस उपनिरीक्षक प्रविण नागेश जर्दे (रा. शांतीबन सोसायटी, कोथरुड) असे बलात्काराचा गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.जर्दे सध्या वाहतूक शाखेतील येरवडा विभागात नेमणूकीला आहेत. याप्रकरणी एका २५ वर्षाच्या तरुणीने कोथरुड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

प्रविण जर्दे हे कोथरुड पोलीस ठाण्यात नेमणूकीला असताना मे २०१८ मध्ये त्याने या तरुणीला लग्नाचे आमिष दाखविले. तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. गंधर्व लॉज, भूगाव, तसेच ‘द वन सोसायटी’ भुगाव येथे नेऊन तिच्याशी शारिरीक संबंध ठेवले. ही तरुणी ब्युटीशियन म्हणून काम करते. तिने लग्नाबाबत विचारणा केल्यावर त्याने मी पोलीस अधिकारी आहे. तुझे तुकडे तुकडे करुन तुला संपवून टाकीन, कोणी माझे काही वाकडे करु शकत नाही. मी सर्व मॅनेज करेन, असे म्हणून फिर्यादी यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे त्यांनी शेवटी पोलिसांकडे धाव घेतली आहे. महिला सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

Related Stories

No stories found.