
मुंबई | Mumbai
सध्या राज्यात उष्णतेच्या लाटेमुळे (Heat Wave) सर्व हैराण झाले आहेत. अशातच मुंबईकरांसाठी एक दिलासादायक वृत्त समोर येत आहे....
एसी लोकलचे (AC Local) दर सर्वसामान्यांना परवडत नव्हते. मात्र आता तिकिटांच्या दारात (Ticket Rates) ५० टक्के घट करण्याची घोषणा केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केली आहे.
रावसाहेब दानवे यांनी आज भायखळा रेल्वे स्थानकास भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. या निर्णयामुळे मुंबई एसी लोकलचा (Mumbai AC Local) प्रवास सर्वसामान्यांना शक्य होणार आहे. मुंबई एसी लोकलचे सध्याचे कमीत कमी दर ६५ रुपये आहेत. आता हेच दर ३० रुपयांवर आले आहेत.
मोदी सरकारच्या (Modi Government) या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एसी लोकलचे दर (AC Local Rates) कमी केल्यामुळे रावसाहेब दानवे (Raosahev Danve) यांचे आभार मानले आहे.
सध्या ५ किमीसाठी ६५ रुपये आकाराला जातात. आता ५ किमीसाठी ३० रुपये आकारले जातील. २५ किमीसाठी १३५ रुपये दर असून आता सुधारित दर ६५ रुपये असेल. ५० किमीच्या प्रवासासाठी सध्या २०५ रुपये भाडं आकारले जाते मात्र आता १०० रुपये आकारले जातील.
१०० किमीच्या प्रवासासाठी २९० रुपये तिकीट होते तर आता हेच तिकीट १४५ रुपये होईल. १३० किमीच्या प्रवासासाठी ३७० रुपये दर होता. आता १८५ रुपये आकारले जातील.