राजगृह बंदोबस्त
राजगृह बंदोबस्त |digi
महाराष्ट्र

‘राजगृह’ तोडफोड प्रकरणातील संशयितास अटक

माटुंगा पोलिसांची माहिती

Gokul Pawar

Gokul Pawar

मुंबई । Mumbai :

दादर येथील हिंदू कॉलनीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान 'राजगृह' ची, अज्ञातांनी तोडफोड केली होती. हा प्रकार ७ जुलै रोजी घडला होता. या घटनेनंतर राज्यात आरोपींच्या विरुद्ध कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली होती. आता या प्रकरणी एका संशयितास अटक केली आहे. उमेश सीताराम जाधव असे या संशयिताचे नाव असून, माटुंगा पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे.

सदर प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना सोपवण्यात आले होते. त्यामधील चेहऱ्याशी साधर्म्य असल्यामुळे या संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून, त्याची चौकशी सुरू आहे. दरम्यान, याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुख्य संशयितासोबत आणखी एक व्यक्ती असल्याचे चौकशीमध्ये निष्पन्न झाले आहे. आता पोलीस दुसऱ्या व्यक्तीच्या शोधात आहेत. उमेश जाधव हा प्रेस भागात राहणारा ३५ वर्षांचा तरुण आहे. तो बिगारी काम करतो अशी माहिती समोर आली आहे.

दरम्यान दि.०७ जुलै रोजी संध्याकाळी दोन इसमांनी 'राजगृह' येथे तोडफोड केली. यामध्ये घरा सभोवतालच्या कुंड्या व झाडांची नासधूस झाली आहे. राजगृहाच्या काचांवर दगडफेक करण्यात आली आहे. यासह घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमऱ्यांचीही तोडफोड केली आहे. या घटनेनंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राजगृहाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com