लॉकडाऊन करा अन्यथा निर्बंध हटवा

आरोग्यमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांना विनंती
लॉकडाऊन करा अन्यथा निर्बंध हटवा
आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

कोरोनाच्या (corona) रुग्ण संख्येत दररोज घट होतांना दिसत आहे. यामुळे आरोग्य व्यवस्थेवरील (Health Department) ताण कमी होत आहे. परंतु तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त करण्यात आल्याने राज्यात लागू करण्यात आलेली जिल्हानिहाय पाच टप्प्यांतील निर्बंध प्रणाली रद्द करून सरसकट निर्बंध लागू करण्यात आले आहेत. हे निर्बंध हटवण्याची मागणी सर्वसामान्यांकडून केली जात आहे....

आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी जालना येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सध्या राज्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांसंदर्भात आपली भूमिका मांडली.

कडक लॉकडाऊन करावा किंवा पूर्णपणे निर्बंध काढून जनतेला दिलासा द्यावा अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांना केली आहे.

देशात आणि महाराष्ट्रात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव अजून कायम आहे. पश्चिम महाराष्ट्रात करोनाचा उद्रेक कायम असला, तरी राज्याच्या इतर भागात करोना रुग्नासंख्येत घट झाली आहे. तरीही निर्बंध पूर्णपणे शिथिल करण्यात न आल्यामुळे सर्वसामान्यांना त्रास होत आहे.

त्यामुळे एक तर कडक लॉकडाऊन करावे किंवा हे निर्बंध पूर्णतः काढून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com