'आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे पण सरकारकडून कडक शासन व्हायलाच हवं'

नाशिकच्या दुर्घटनेनंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रतिक्रिया
'आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे पण सरकारकडून कडक शासन व्हायलाच हवं'
Raj Thackeray

मुंबई l Mumbai

नाशिकच्या झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन गळती झाली. ऑक्सिजनची गळती झाल्याने जवळपास २२ रुग्णांचा मृत्यू झाला तर ३० पेक्षा अधिक रुग्ण अत्यवस्थ आहेत.

या घटनेनंतर प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत असून कारवाईची मागणी केली जात आहे. नाशिकच्या दुर्घटनेनंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरे यांनी म्हंटल आहे की, 'ऑक्सिजन गळतीमुळे नाशिक येथील रुग्णालयात निष्पाप रुग्णांना जीव गमवावा लागला. ही घटना अतिशय वेदनादायी आहे. मृतांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची श्रद्धांजली. आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे पण जर कुणाकडून बेपर्वाई झाली असेल तर त्यांना सरकारकडून कडक शासन व्हायलाच हवं,' असं राज ठाकरे म्हणाले आहे.

ऑक्सिजन गळती दुर्घटनेत प्राण गमावलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपये मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. तसंच, या घटनेचे उच्चस्तरीय आदेश ही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com