राज ठाकरे रुग्णालयातून घरी परतले

हिपबोनवरील शस्त्रक्रिया यशस्वी || पुढील दोन ते तीन महिने विश्रांतीचा सल्ला
राज ठाकरे रुग्णालयातून घरी परतले

मुंबई |प्रतिनिधी| Mumbai

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांच्यावर "हिप बोन"ची (Hip Bone) यशस्वी शस्त्रक्रिया (Surgery0 पार पडल्यानंतर त्यांना शनिवारी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. पुढील दोन ते तीन महिने त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर २० जून रोजी लिलावती रुग्णालयात हिप बोनची शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर राज यांनी आज फेसबुक पोस्ट शेअर करत आपल्याला डिस्चार्ज मिळाल्याची माहिती दिली.

आपल्या आशीर्वादाने आणि प्रार्थनेने माझी शस्त्रक्रिया व्यवस्थितरित्या पार पडली. मी काही वेळापूर्वीच रुग्णालयातून घरी पोहोचलो आहे. आपले आशीर्वाद आणि प्रेम असेच कायम असू दे' असे राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

ठाकरे यांच्यावर हिप बोनची दीड तास शस्त्रक्रिया चालली. त्यांना पाच दिवस रुग्णालयात ठेवण्यात आले होते. रुग्णालयात त्यांना फिजिओथेरपी देण्यात आली. यानंतर त्यांना आज डिस्चार्ज मिळाला असून त्यांच्यावर घरीसुद्धा फिजिओथेरपी आणि उपचार करण्यात येणार आहेत, अशी माहिती लिलावतीच्या डॉक्टरांनी दिली.

डॉक्टरांनी राज यांना पुढचे दोन ते तीन महिने विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांना कोणतीही सभा, भाषण किंवा बैठक घेता येणार नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com