Rain Update : मुंबईत पावसाचा जोर वाढला

राज्यात सर्वत्र पावसाचा अंदाज
Rain Update : मुंबईत पावसाचा जोर वाढला

मुंबई | Mumbai

देशातील अनेक भागांत मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडत आहे. मुंबईत (Mumbai) गुरुवारपासून सुरू झालेला पाऊस अद्यापही कायम आहे. आज सकाळपासून पुन्हा एकदा पावसाने जोर पकडला आहे.

पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. अजूनतरी कुठे रस्ते किंवा रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याचे वृत्त नाहीय. सध्या मुंबईत रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू आहे. पण सायनमध्ये गुरुकृपा हॉटेल परिसर, साधना विद्यालय भागात पाणी साचलं आहे.

आयएमडीच्या मुंबई केंद्रानुसार, पुणे (Pune), रायगड (Raigad), रत्नागिरी (Ratanagiri), कोल्हापूर (Kolhapur) आणि साताऱ्यात (Satara) अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

तसेच, महाराष्ट्रातील मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भात (Vidarbha) शुक्रवारी हलक्या सरी कोसळू शकतात. २१ आणि २२ जुलै रोजी रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूरला रेड अलर्ट, प्रामुख्याने पुणे, साताऱ्यातील घाट परिसरात अतिवृष्टीची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने २१ आणि २२ जुलै रोजी महाराष्ट्रात सर्वत्र पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. कोकणात पावसाचा जोर पुढील पाच दिवस कायम राहणार, मध्य महाराष्ट्रासह विदर्भातही पुढील ३-४ दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने चांगल्या पावसाचा अंदाज देण्यात आले आहे.

कोकण पट्ट्यावर आणि मध्य महाराष्ट्रावर ढगांची दाटी कायम, त्यामुळे ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा, पुणे आणि कोल्हापूरातील घाट माथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस अपेक्षित आहे. २१ आणि २२ जुलै रोजी महाराष्ट्रात सर्वत्र चांगला पाऊस अपेक्षित, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने पावसाचा अंदाज व्यक्त करत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com