राज्यात पावसाचा जोर वाढणार; हवामान विभागाचा अंदाज

राज्यात पावसाचा जोर वाढणार; हवामान विभागाचा अंदाज

मुंबई | Mumbai

राज्यात बहुतांश भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने (Rain) विश्रांती घेतली होती. मात्र गणपती बाप्पाचं (Ganesh Chaturthi) आगमन होताच राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे.

राज्यातील बहुतांश ठिकाणी अधून मधून पावसाच्या सरी कोसळत आहे. आता राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस (Rain) कोसळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबई मध्ये मागील काही दिवस ऊन पावसाचा खेळ सुरू आहे. त्यामुळे उष्णता वाढली आहे. पण आता पुढील काही दिवस धुव्वाधार पाऊस बरसण्याचा अंदाज आहे. पुढील ३,४ दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलक्या किंवा मध्यम गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तसेच कोकण, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, बुलडाणा, यवतमाळ, चंद्रपूर, नाशिकसह पुणे विभागात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com