
मुंबई | Mumbai
मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. नुकतेच राज्यातील करोनाबाबतचे (Corona) सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय राज्य सरकारने (State Government) घेतला आहे. त्यानंतर आता रेल्वेने (Railway) एका मोठा निर्णय घेतला आहे...
लसीकरणासंबंधित (Vaccination) असलेले सर्व पर्याय आता तिकीट अॅपमधून (App) हटवण्यात आले आहे. करोनाच्या निर्बंधांमुळे केवळ लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरीकांनाच लोकलने प्रवास करण्याची मुभा होती. आता करोना निर्बंध हटवल्याने रेल्वेने लसीकरणाचे पर्याय हटवण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे मुंबईतील रेल्वेसाठी असलेल्या काउंटरवर आणि अॅपवर आता सर्वांसाठी तिकीट उपलब्ध असणार आहे. तसेच करोना काळात सर्व अधिकृत प्रवेश-एक्झिट गेट्स, लिफ्ट्स बंद होते ते आता खुले करण्यात येतील.
याशिवाय फूट ओव्हरब्रिज, सर्व व्यावसायिक तिकीट काउंटर आणि बुकिंगसाठी एटीव्हीएम मशीनही उघडल्या जातील, असे एका रेल्वे अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.