क्रुझवरील ड्रग्स पार्टी : NCB चा मोठा खुलासा

क्रुझवरील ड्रग्स पार्टी : NCB चा मोठा खुलासा

मुंबई | Mumbai

अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (Narcotics control Bureau) शनिवारी रात्री मुंबईच्या (Mumbai) समुद्रात सुरु असणाऱ्या एका रेव्ह पार्टीवर धाड (rave party raid) टाकली. या प्रकरणी आतापर्यंत एकूण १३ जण ताब्यात घेतले असून यात तीन महिलांचा समावेश आहे. तसेच ताब्यात घेतलेल्यांमध्ये बॉलिवूडच्या (bollywood) एका मोठा अभिनेत्याच्या मुलाचाही समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून गोव्याला (mumbai goa cruise) जाणाऱ्या क्रुझवर ही रेव्ह पार्टी सुरु होती. शनिवारी ही बोट गोव्याच्या दिशेने निघाली होती. सोमवारी ही बोट पुन्हा मुंबईत परतणार होती. या क्रुझवर हायप्रोफाईल रेव्ह पार्टी होणार असल्याची माहिती NCB ला मिळाली होती. त्यानुसार NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे (sameer wankhede) आणि त्यांच्या पथकाने अगोदरच क्रुझवर प्रवेश मिळवला होता. क्रुझ गोव्याच्या दिशेने निघाल्यानंतर रेव्ह पार्टीला सुरुवात झाली. यावेळी समीर वानखेडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह छापा टाकला. या रेव्ह पार्टीत बॉलीवूडशी संबंधित काहीजण उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

क्रुझवरील ड्रग्स पार्टी : NCB चा मोठा खुलासा
शाहरुखने म्हटले होते, मुलाने ड्रग्स घ्यावे, डेटींग करावी अन...

दरम्यान क्रूजवर ड्रग्ज कसं आणलं याबाबत आता माहिती समोर येत आहे. एनसीबीने ज्या बॉलिवूड अभिनेत्याच्या मुलाला ताब्यात घेतलं आहे त्यानं लेन्सच्या डबीमधन ड्रग्ज आणल्याची माहिती मिळाली आहे. तसंच ज्या महिलांना ताब्यात घेण्यात आलं आहे त्यांनी पर्सचे हँडल आणि सॅनिटरी पॅडच्या आत लपवून ड्रग्ज आणले असल्याचं सांगण्यात येत आहे. याशिवाय काहींनी अंडरवीयरच्या शिलाईच्या आत आणि पॅन्ट च्या शिलाईच्या आत लपवून आणले असल्याची माहिती मिळत आहे.

तसेच या प्रकरणी NCB ने पार्टी आयोजकांना समन्स बजावले आहे. या सर्वांना NCB समोर सकाळी ११.३० ला हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे. दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार ही पार्टी 6 लोकांनी आयोजित केल्याचे समजते आहे.

Related Stories

No stories found.