पुणे विद्यापीठाच्या दुसर्‍या सत्राच्या परीक्षा जूनच्या तिसर्‍या आठवड्यापासून

पुणे विद्यापीठाच्या दुसर्‍या सत्राच्या परीक्षा जूनच्या तिसर्‍या आठवड्यापासून

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या दुसर्‍या सत्राच्या परीक्षा जूनच्या तिसर्‍या आठवड्यापासून टप्प्याटप्प्याने घेण्यात येणार आहेत.

आज शनिवारी विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दुसर्‍या सत्राची परीक्षा सुद्धा ऑनलाइन पद्धतीनेच होणार असून, विद्यापीठाने 15 मे पासूनच या परीक्षांचे अर्ज भरून घेण्यास सुरुवात केली आहे. विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत दुसर्‍या सत्रातील परीक्षा घेण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

प्रथमतः कला वाणिज्य आणि विज्ञान या अभ्यासक्रमाच्या परीक्षा जूनच्या तिसर्‍या आठवड्यापासून सुरु करून अभ्यासक्रमाच्या परीक्षा टप्प्याटप्प्याने घेण्यात येणार आहेत. तसेच प्रात्यक्षिक परीक्षांचे गुणही महाविद्यालयांकडून स्वीकारण्याबाबत कालावधी निश्‍चित करण्यात आला.

दरम्यान, करोनाच्या संकटामुळे विद्यापीठाचे शैक्षणिक व परीक्षेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडली आहे. त्यातच करोनामुळे महाविद्यालये आणि विद्यापीठ बंद असून ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये महिन्यात होणारी विद्यार्थ्यांची प्रथम सत्र परीक्षा कोरोनामुळे एप्रिल महिन्यापासून घ्यावी लागली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com