
पुणे(प्रतिनिधि)
पुणे रेल्वे स्थानकात आज सकाळी वस्तू आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. ही वस्तु प्रथमदर्शनी बॉम्ब नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले होते. मात्र, बॉम्बनाशक पथकाने ही बॉम्बसदृश वस्तु बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयांच्या मैदानावर आणून तिथे स्फोट घडवून आणला आणि वस्तु निकामी केल्याने ती वस्तु बॉम्बसदृश वस्तु असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आज सकाळी साडेदहाच्या सुमारास पुणे रेल्वे स्थानकात बॉम्ब सदृश वस्तु आढळून आली होती. ही माहिती मिळताच पोलिस आणि बॉम्ब शोधक पथक स्थानकावर तत्काळ दाखल झाले. पोलिसांनी पुणे रेल्वे स्थानक पूर्ण रिकामे केले होते, तसेच पुण्याकडे येणाऱ्या सर्व रेल्वे गाड्याही थांबविण्यात आल्या होत्या. दरम्यान, प्रथमदर्शनी तरी या वस्तू जिलेटीन असल्याचे वाटत नाही. पण बॉम्बशोधक पथकाकडून या वस्तूंची तपासणी सुरु असल्याचे पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले होते.
त्यानंतर ही वस्तु बी जे वैद्यकीय महाविद्यालयांच्या मैदानात ही आणण्यात आली. बॉम्बनाशक आजूबाजूचा परिसर रिकामा केला. पन्नास ते साठ फूट अंतरवर एक वायर या वस्तूला लावण्यात आली. आजुबाजुला दगड मातीने भरलेले पोते ठेवले. तेथे स्फोट घडवून आणण्यात आला, त्यानंतर एक मोठा आवाज झाला आणि ही वस्तू निकामी करण्यात आली.
पुणे रेल्वे स्टेशनवर सकाळी १०:३५ वाजण्याच्या सुमारास रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक रघुवंशी यांनी पुणे लोहमार्ग पोलीस ठाणे येथे कांबळे यांना दुरध्वनीव्दारे कळविले की, पुणे रेल्वे स्टेशन येथील जनरल रिझर्वेशन काउंटर समोरील मोकळया जागेमध्ये जुन्या आगमन प्रवेशव्दाराजवळ संशयित वस्तु दिसत आहे. बॉम्बशोधक व नाशक पथक, लोहमार्ग पुणे, रेल्वे सुरक्षा बल, पुणे शहर पोलीस तसेच या सर्व विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
वरिष्ठ पोलीस अधिका-यांच्या उपस्थित संशयित वस्तुची बॉम्बशोधक व नाशक पथक व श्वान पथकाकडुन तपासणी केली यात कोणत्याही प्रकारचा स्फोटक पदार्थ नसल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले होते. मात्र संबंधित वस्तुंची अधिक तपासणी करण्याकरिता व ती वस्तु निष्क्रिय करण्याकरिता बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयांच्या मैदानावर स्फोट घडवुन ती वस्तु निकामी करण्यात आली. अंतिम तपासणीच्या निष्कर्षानुसार पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात येत आहे.अशी माहिती यावेळी लोहमार्ग पोलिसांनी दिली आहे.
आज सकाळी साडेदहाच्या सुमारास पुणे रेल्वे स्थानकात बॉम्ब सदृश वस्तु आढळून आली होती. ही माहिती मिळताच पोलिस आणि बॉम्ब शोधक पथक स्थानकावर तत्काळ दाखल झाले. पोलिसांनी पुणे रेल्वे स्थानक पूर्ण रिकामे केले होते, तसेच पुण्याकडे येणाऱ्या सर्व रेल्वे गाड्याही थांबविण्यात आल्या होत्या. दरम्यान, प्रथमदर्शनी तरी या वस्तू जिलेटीन असल्याचे वाटत नाही. पण बॉम्बशोधक पथकाकडून या वस्तूंची तपासणी सुरु असल्याचे पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले. या घटनेनंतर पुणे पोलीस स्थानकाच्या परिसरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
पुणे स्थानकावर शुक्रवारी नेहमी प्रमाणे वर्दळ असतांना बॉम्बसदृष्य वस्तू सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ही बॉम्ब सदृष्य वस्तू फटाक्यासारखी आहे अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, ही वस्तू स्थानकावर कुणी आणली ? या मागे काही घातपात करण्याचा हेतू होता का ? या प्रश्नांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान बॉम्ब शोधक पथकाने स्थानकाच्या गेट समोरील एक फटाका सदृष्यवस्तू निकामी केली आहे.
तब्बल तासाभराच्या तपासणीनंतर रेल्वे स्थानकावर सापडलेल्या या वस्तू बॉम्ब नसल्याचे स्पष्ट झाले. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी याबद्दल माहिती देताना सांगितले की, पुणे रेल्वे स्थानकावर कोणताही बॉम्ब किंवा स्फोटके आढळलेली नाहीत. फलाट क्रमांक १ आणि २ पुन्हा एकदा रहदारीसाठी खुले करण्यात आले असून रेल्वे वाहतूकही पूर्ववत सुरु झाली आहे.
दरम्यान, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या घटनेची गांभिर्याने दखल घेतली असून यंत्रणांना हायअलर्ट मोड वर ठेवण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी दोघांनी रेल्वे स्थानक उडवून देण्याची धकमी दिली होती. तसेच स्थानक परिसरात बॉम्ब असल्याचे सांगत त्या जागा सांगण्यासाठी ७ कोटी रुपयांची मागणी केली होती. पुणे पोलिसांनी त्या दोघांना अटक केली होती.