पुणे रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी

पुणे रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी

पुणे | Pune

पुण्यामधून एक मोठी बातमी समोर येत आहे. पुणे रेल्वे स्थानक बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर पुणे रेल्वे स्थानक परिसरातील पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. पोलीस आसपास होणाऱ्या सर्व घडामोडींवर लक्ष ठेऊन आहेत. रेल्वे स्थानकावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. प्रवाश्यांनाही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे स्थानक उडवून देण्याची धमकी देणारा फोन हा मनमाडमधून आल्याची माहिती समोर आली आहे. या माहितीच्या आधारे पुणे पोलिसांची एक टीम या व्यक्तीला अटक करण्यासाठी मनमाडला रवाना झाली आहे. ही व्यक्ती कोण आहे तिने असा फोन का केला यासंदर्भातील माहिती आता पुढील कारवाईनंतरच समोर येईल.

दरम्यान, जी-२० परिषदेअंतर्गत महाराष्ट्रात एकूण १४ बैठका होणार असून त्यातील ४ बैठका पुण्यात पार पडणार आहे. त्यापैकी पहिली बैठक ही १६ आणि १७ जानेवारी रोजी पार पडणार आहे. याच बैठकीच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये शुशोभिकरणाबरोबरच सुरक्षेमध्येही वाढ करण्यात आली आहे. असं असतानाच आज सकाळी पुणे रेल्वे स्थानक बॉम्बनं उडवण्याची धमकी देण्यात आल्याने एकच खळबळ उडली.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com