...म्हणून पुणे पोलिसांनी जॅकलिन फर्नांडिसचे मानले आभार

...म्हणून पुणे पोलिसांनी जॅकलिन फर्नांडिसचे मानले आभार

पुणे -

करोनाविरुद्धच्या लढाईसाठी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिने पुणे पोलिसांना आर्थिक मदत केली आहे. यानंतर जॅकलिन फर्नांडिस हिचे आभार व्यक्त करण्यासाठी पुणे पोलिसांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून एक ट्विट केले आहे.

या ट्विटमध्ये म्हटले आहे, पुणे पोलिस फाऊंडेशनला केलेल्या मदतीबद्दल जॅकलिन फर्नांडिस हिचे आभार. करोना काळात फ्रंटलाईन वर्कर्सप्रमाणे पोलिस आपले कर्तव्य बजावत आहेत. तुम्ही केलेल्या मदतीचा त्यांना दीर्घकाळासाठी उपयोग होईल.

या ट्विटमध्ये पुण्याचे पोलिस आयुक्त आणि जॅकलिन फर्नांडिस यांचा उल्लेख करण्यात आला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com