पुणे- नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे; जमिनीसाठी रेडी रेकनरच्या 5 पट दर

पुणे- नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे; जमिनीसाठी रेडी रेकनरच्या 5 पट दर
file photo

पुणे |प्रतिनिधी| Pune

रेल्वेच्या पुणे- नाशिक सेमी हायस्पीड दुहेरी ब्रॉडगेज लाइनच्या (Pune - Nashik Semi High Speed ​​Double Gauge Line) बांधकामासाठी खासगी वाटाघाटीद्वारे जमिनीच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू (land Editing Process) आहे. याअंतर्गत संपूर्ण प्रकल्पातील पहिले खरेदीखत पूर्ण झाले. दरम्यान, जमिनीसाठी रेडी रेकनरच्या 5 पट दर (Rate) देण्यात येत आहे. इमारत तसेच इतर बांधकामे, झाडे आदींसाठी मूल्यांकनाच्या अडीच पट रक्कम दिली जाणार आहे.

या प्रकल्पासाठी खरेदीने जमीन दिलेल्या स्मिता आणि चंद्रकांत कोलते यांचा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी या खरेदीखतासाठी पुढाकार घेतलेल्या भूसंपादन क्र. 4 च्या उपजिल्हाधिकारी रोहिणी आखाडे- फडतरे, रेल्वेचे सहमहाव्यवस्थापक (प्रकल्प) सागर अग्रवाल, सहमहाव्यवस्थापक (नियोजन) व्ही. के. गोपाल उपस्थित होते. हवेली तालुक्यातील 12 गावांचे भूसंपादनाचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. यातील 8 गावांची पूर्ण तर 2 गावांची अंशत: संयुक्त मोजणी पूर्ण झाली आहे.

पहिले खरेदीखत हे हवेली तालुक्यातील पेरणे गावातील असून प्रकल्पात समावेश असलेल्या तीनही जिल्ह्यातील हे पहिले खरेदीखत आहे, अशी माहिती यावेळी आखाडे- फडतरे यांनी दिली. जिल्ह्यात प्रकल्पासाठी भूसंपादन करावयाच्या गावांपैकी 37 गावांची मोजणी पूर्ण झाली आहे. तसेच उर्वरित प्रकरणात मोजणी प्रक्रिया, मूल्यांकन टिपणी सहाय्यक नगररचना कार्यालयाकडे पाठवणे आदी प्रक्रिया सुरू आहे.

पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यांतून हा रेल्वे मार्ग जाणार आहे. पुणे जिल्ह्यातील हवेली, खेड, आंबेगाव आणि जुन्नर अशा चार तालुक्यांत मिळून एकूण 54 गावांचा यात समावेश आहे. पुणे जिल्ह्यात पुणे, हडपसर, मांजरी, वाघोली, आळंदी, चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा या स्थानकांचा समावेश आहे. प्रमुख स्थानकांपैकी चाकण, मंचर तसेच नारायणगाव ही स्थानके कृषी उत्पादन व खासगी मालवाहतूक टर्मिनल नियोजित असून राजगुरुनगर स्थानक हे फक्त प्रवाशांसाठी असेल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com