नगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात; दोन चिमुकल्यासह ५ जणांचा मृत्यू

Accident
Accident

पुणे | Pune

राज्यातील महामार्गावरील अपघाताचे सत्र चालूच आहे. पुणे जिल्ह्यात जुन्नर नगर कल्याण महामार्गावर भीषण अपघात झाला. नगर कल्याण महामार्गावर अंधारात पिकअप जीपने दोन दुचाकींना धडक देत ८ जणांना चिरडले.

या अपघातात दोन दोन चिमुकल्यासह ५ जणांचा मृत्यू झाला. शेतीचं काम संपवून सगळे शेतमजून आपल्या पारनेर (Parner) या गावी निघाले होते अशी माहिती मिळाली आहे.

Accident
अख्खं कुटुंब संपलं! दोन मुलांसह उच्चशिक्षित पती पत्नीची विष घेवून आत्महत्या

मिळालेल्या माहितीनुसार, नारायणगाव येथुन शेतमजुरीची कामे उरकुन पारनेर तालुक्यातील पळशी वनकुटे येथे घराकडे जात असताना शेतमजुरांना नगर कल्याण महामार्गावर लवणवाडी येथे पिकअप जीपने दुचाकीवरील आठ जणांना जोराची धडक दिली. त्यामध्ये चिमुकल्यांसह एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर उपचारादरम्यान तीन असे पाच जणांचा मृत्यु झाल्याची माहिती समोर आली आहे.

Accident
बॅनर उद्धवजींचा, धूर राष्ट्रवादीतून... घरचा उपाशी, बाहेरचा तुपाशी; जितेंद्र आव्हाड आणि शीतल म्हात्रे यांच्यात जुंपली

दोन चिमुकली, दोन पुरुष, एक महिला यांचा समावेश आहे. मृत्यु झालेले सर्व शेतमजुर असून शेतमजुरीचे काम संपवुन सर्व पारनेर तालुक्यातील गावाला जात असताना रात्रीच्या अंधारात पिकअप जीपने चिरडल्याची घटना घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पिकअप चालक मद्यधुंद अवस्थेत होता. अपघातग्रस्तांना स्थानिकांनी मदत करत रुग्णालयात पोहोचवले. अपघाताची नोंद पोलिसात झाली असून आळेफाटा पोलिस पुढील तपास करत आहेत.

Accident
सदू - मधू एकमेकांचे अश्रू पुसण्यासाठी भेटले असतील
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com