‘पुण्याचा निर्धार, कोरोना हद्दपार’

पुणे महापालिकेची ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ अंतर्गत मोहीम
 ‘पुण्याचा निर्धार, कोरोना हद्दपार’

पुणे (प्रतिनिधी) -

पुण्यातील कोरोना रुग्णसंख्येत काही दिवसांपासून घट होताना दिसत असली तरी केंद्रीय आरोग्य पथकाने डिसेंबर, जानेवारी

महिन्यात पुन्हा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढण्याबाबत रेड अलर्ट दिला आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन याबाबत जनजागृती व्हावी आणि लोकांनी तत्पर तपासणी करून लवकर निदान करून घ्यावं यासाठी पुणे महापालिकेच्या वतीने ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत ‘पुण्याचा निर्धार, कोरोना हद्दपार’ या मोहिमेला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. मोहीम राबविण्यासाठी एका टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये शासनाच्या वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे.

ही मोहीम कशी राबविली राबवावी, नागरिकांमध्ये जनजागृती कशी करावी, याची माहिती यावेळी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना देण्यात आली. आजपासून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला असून विभागीय आयुक्त डॉ. सौरभ राव हे या मोहिमेचे प्रमुख असणार आहेत.

यावेळी बोलताना महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आता निर्णायक टप्प्यावर आली आहे. त्यामुळे कोरोना कायमचा संपविण्यासाठी नवनवीन उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महापालिका काही उपाययोजना करीत आहे. भाग म्हणून ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी’ अंतर्गत, ‘पुण्याचा निर्धार, कोरोना हद्दपार' या मोहिमेला सुरवात करण्यात आली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून जनजागृतीला व्यापक स्वरूप देण्याचा आमचा मानस आहे. काहीही करून कोरोनाला हद्दपार करणे हे या मोहिमेचा उद्दिष्ट आहे असल्याचे मोहोळ यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com