Fire : पुण्यात IT पार्कमध्ये भीषण आग, अनेक कर्मचारी अडकल्याची भीती

Fire : पुण्यात IT पार्कमध्ये भीषण आग, अनेक कर्मचारी अडकल्याची भीती

पुणे | Pune

पुण्यातील कल्याणी नगर परिसरातील IT कंपनीला भीषण आग लागली आहे. इमारतीच्या पाचव्या मजल्यावर लागली आग लागली आहे.

अनेक कर्मचारी आत अडकले असून बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या आगीमुळे कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहे.

Fire : पुण्यात IT पार्कमध्ये भीषण आग, अनेक कर्मचारी अडकल्याची भीती
चोरट्यांचे भलतेच धाडस! दिवसाढवळ्या घरातून २५ हजारासह तीन तोळे सोनं लांबवले

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी पुण्यातल्या मारीगोल्ड आयटी पार्कमध्ये स्फोट झाल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली होती. त्यानुसार अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या होत्या. मारीगोल्ड आयटी पार्कमध्ये काम करणारे कर्मचारी हे वरच्या मजल्यावर अडकले असल्याचं दृश्य दिसत होतं.

जवानांनी उंच शिड्यांचा वापर करून आणि इमारतीच्या काचा फोडून अडकलेल्या काही कर्मचाऱ्यांची सुटका केल्याचं दृश्य फोटोमधून दिसत आहे. तर काही कर्मचारी हे आग लागल्यामुळे टेरेसवर पळाले होते. त्यामध्ये काही कर्मचाऱ्यांना वाचवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे. तर अडकलेल्या कर्मचाऱ्यांसाठी बचावकार्य सुरू आहे.

Fire : पुण्यात IT पार्कमध्ये भीषण आग, अनेक कर्मचारी अडकल्याची भीती
ATM फोडले, रकमेसह मशीनही चोरून नेले, पण....

दरम्यान पुण्यातील मार्केटयार्ड येथील कागद/पुठ्ठा गोडाऊनला मध्यरात्री १ च्या सुमारास भीषण आग लागली. या घटनेत गोडाऊनमधील मोठा माल जळून भस्मसात झाला. अग्निशामक दलाच्या ९ बंब आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी जात आगीवर नियंत्रण मिळवले

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com