करोनाने एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

करोनाने एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

पुणे (प्रतिनिधि) - पुण्यामध्ये कोरोनाने उग्र रूप धारण केले असून दररोज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतीच आहे. रुग्णांबरोबरच कोरोनामुळे मृत्यूही दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. पुण्यातील एकाच कुटुंबातील सर्व पाच जणांचा 15 दिवसांत कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

पुण्यातील जाधव कुटुंबातील पाच जणांचा गेल्या 15 दिवसांत कोरोनाने मृत्यू झाला आहे. आई अलका जाधव, भाऊ रोहित जाधव, अतुल जाधव आणि बहीण वैशाली गायकवाड यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

जाधव कुटुंबीयांनी काही दिवसांपूर्वी घरात पूजेचं आयोजन केलं होतं. या पूजेच्या निमित्ताने घरातील सर्वजण एकत्र आले होते. एकाच कुटुंबातील सर्वजण असल्याने ते काहीसे निश्चिंत होते. मात्र एकामागोमाग एकाला कोरोनाने गाठलं. पुढे त्यांची प्रकृती बिघडत गेली आणि अवघ्या 15 दिवसात तब्बल 5 जणांचा मृत्यू झाला.

एकाच कुटुंबातील पाच जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. अवघ्या 15 दिवसात संपूर्ण कुटुंबच्या कुटुंब मृत्यूमुखी पडल्याने, कोरोनाचं भयाण रुप समोर येत आहे.

पुण्यातील कोरोना स्थिती बिकट होत चालली आहे. दररोज रुग्णवाढीचा वेग जोराने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील सर्वच गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये रहिवाशांव्यतिरिक्त बाहेरील व्यक्तींना प्रवेश करण्यास प्रतिबंध लावण्यात आला आहे. तसेच नियमित सोसायटीमध्ये येणाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी आवश्यक आहे, असे आदेश पुणे महापालिकेने दिले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com