टीईटी घोटाळयाप्रकरणी मोठा मासा पुणे पोलिसांच्या गळाला; आयएएस अधिकाऱ्याला अटक

टीईटी घोटाळयाप्रकरणी मोठा मासा पुणे पोलिसांच्या गळाला; आयएएस अधिकाऱ्याला अटक

पुणे | Pune

आज टीईटी परीक्षा घोटाळयाप्रकरणी (TET Exam Scam) पुणे सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) एक मोठी कारवाई केली आहे. कृषी विभागातील आयएएस अधिकारी सुशील खोडवेकरला (Sushil Khodvekar) ठाण्यातून अटक (Arrested) करण्यात आली आहे...

आज दुपारी त्यांना पुणे सायबर पोलिसांनी ठाण्यातून अटक केली आहे. सुशील खोडवेकर २००९ च्या बॅचचे आयएएस (IAS) अधिकारी आहेत. शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागात उपसचिव म्हणून ते कार्यरत होते. तर, शिक्षक भरती परीक्षेतील गैरव्यवहारात त्यांचाही सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

टीईटी घोटाळयाप्रकरणी मोठा मासा पुणे पोलिसांच्या गळाला; आयएएस अधिकाऱ्याला अटक
Visual Story : अबब! 'पुष्पा'च्या आयटम साँगसाठी समांथाने आकारले पाच कोटी

टीईटी घोटाळा प्रकरणातील ही आतापर्यंतची ही मोठी कारवाई मानली जात आहे. आता खोडवेकर यांच्या चौकशीतून या प्रकरणात आणखी कोणकोण सहभागी आहेत, हे देखील उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहार (टीईटी) प्रकरणाचा सखोल तपास सुरू असताना या परीक्षेतील २०१८ च्या निकालात घोटाळा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त सुखदेव डेरे (Sukhdev Dere) तसेच परीक्षा घेणाऱ्या जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीसचा तत्कालीन व्यवस्थापक सामील झाल्याची धक्कादायक माहिती तपासात मिळाली आहे.

टीईटी घोटाळयाप्रकरणी मोठा मासा पुणे पोलिसांच्या गळाला; आयएएस अधिकाऱ्याला अटक
Visual Story : ‘या’ भारतीय क्रिकेटपटूनं वाढदिवशीच उरकला साखरपुडा; फोटोज व्हायरल

या दोघांना पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने अटक केली आहे. परीक्षेतील निकालासाठी ५०० अपात्र परीक्षार्थींकडून प्रत्येकी ५० ते ६० हजार रुपये घेण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

टीईटी घोटाळयाप्रकरणी मोठा मासा पुणे पोलिसांच्या गळाला; आयएएस अधिकाऱ्याला अटक
Visual Story : केएल राहुल आणि अथियाच्या लग्नाबाबत सुनील शेट्टी म्हणतात...

तसेच, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे (Tukaram Supe), शिक्षण विभागातील तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर (Abhishek Savarikar), संजय सानप (Sanjay Sanap) यांना अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप (Dattatraya Jagtap) यांनी यासंदर्भात फिर्याद दिल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com