पुणे
पुणे
महाराष्ट्र

पुण्यातही बंधने उठविण्यात येणार

दुकानदारांची अनेक दिवसांची ही मागणी मान्य

Rajendra Patil Pune

पुणे

पुण्यामध्ये कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन करण्यात आला. परंतु, ‘पुनश्च हरिओम’ केल्यानंतर काही नियमांमध्ये शिथिलता आणली गेली. मध्ये पुन्हा कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्यानंतर दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्यात आला. त्यानंतर मात्र, आता अनेक गोष्टींच्या नियमावलीत शिथिलता प्रशासन आणि पुणे महापालिकेकडून आणली जात आहे. आता प्रतिबंधित क्षेत्र वगळता दुकानदारांना जे सम- विषम तारखेचे बंधन होते. ते काढून टाकण्यात आले आहे. मुंबईनंतर पुण्यातही दुकाने उघडण्यासाठी सम-विषमचे असलेले बंधन उठविण्यात येणार आहे. दुकानदारांची अनेक दिवसांची ही मागणी मान्य झाल्याने व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

पुण्यातली दुकानं एक दिवसाआड सम आणि विषम तारखांप्रमाणे उघडण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र आता लवकरच हे बंधनही उठवण्यात येणार आहे. पुणे महापालिकेचे आयुक्त यासंबंधी आदेश लवकरच काढतील. नव्या नियमाप्रमाणे शहरातली सर्व दुकानं सकाळी ९ ते ७ या वेळेत सुरू राहणार आहे.

व्यापाऱ्यांची अनेक दिवसांची मागणी मान्य करून आयुक्त विक्रमकुमार यांनी हा निर्णय घेतला आहे. पुण्यात्तील कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. परंतु, लॉकडाऊनचे नियम मात्र शिथिल करण्यात आले आहेत. मुंबईत नुकतीच दुकानं उघडण्याला परवानगी देण्यात आली. आता मुंबईनंतर पुण्यातही दुकाने उघडण्यासाठी सम-विषमचे असलेले बंधन उठविण्यात येणार आहे.

पाणीकपात न करण्याचाही घेतला निर्णय

व्यापाऱ्यांच्या बाबतीत निर्णय घेतल्यानंतर पुणेकरांसाठी महापालिकेने अजून एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात पुरेसा पाऊस झाला नसल्याने पाणीकपात होण्याची शक्यता होती. पण तूर्तास किमान गणेशोत्सवापर्यंत पाणीकपात न करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com