आज पुणे बंद; वाहतुकीत केले 'हे' मोठे बदल

श्रीगोंदा बंद (File Photo)
श्रीगोंदा बंद (File Photo)

पुणे | Pune

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबद्दल वादग्रस्त विधाने केली...

त्यानंतर राजकीय पक्ष आणि अनेक संघटनांनी यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. आज पुणे बंदची हाक देण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्याच्या विरोधात मूक मोर्चाही काढण्यात येणार आहे. हा मोर्चा सकाळी ९ वाजता छत्रपती संभाजी महाराज पुतळा येथून टिळक चौकातून लक्ष्मी रोडने उलट मार्गे बेलबाह चौका-डावीकडे वळून शिवाजीरोडने उलट मार्गे जिजामात चौक, लाल महल इथे समाप्त होणार आहे.

या कालावधीत डेक्कन, विश्रामबाग, फरासखाना वाहतूक विभागाच्या हद्दीतील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत.

श्रीगोंदा बंद (File Photo)
समृद्धी महामार्गावर पहिला अपघात

पुढील रस्ते आवश्यकतेनुसार बंद राहणार

  • लक्ष्मी रोड - सोन्या मारूती चौक ते अलका टॉकीज चौक (मोर्चाच्या सुरुवातीपासून बेलबाग चौक पास होईपर्यंत हा रस्ता बंद राहील)

  • शिवाजी रोड - स. गो. बर्वे चौक (मोर्चा सेवासदन चौक पास झाल्यानंतर मोर्चा संपेपर्यंत)

  • बाजीराव रोड - पुरम चौक ते आप्पा बळवंत चौक (मोर्चा सेवासदन चौक पास होईपर्यंत आवश्यकतेनुसार)

  • गणेश रोड - फकडे हौद चौक ते जिजामाता चौक (मोर्चा सेवासदन चौक पास होईपर्यंत आवश्यकतेनुसार)

  • केळकर रोड - आप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक (मोर्चा बुधावर चौकातून पास होईपर्यंत)

असे आहेत पर्यायी मार्ग

मोर्चाच्या कालावधीत वरील मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी टिळक रोड, केळकर रोड आणि कुमठेकर रोडचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com