Accident : शिवभक्तांच्या वाहनाचा भीषण अपघात; ३५ जखमी

Accident : शिवभक्तांच्या वाहनाचा भीषण अपघात; ३५ जखमी

पुणे | Pune

राज्यात सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. यादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई- बेंगलोर हायवेवर शिवभक्तांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये ३५ जण जखमी झाले आहेत.

बंगळुरू- मुंबई बायपासवर ताथवडे परिसरात हा शिवभक्तांच्या टेम्पोचा भिषण अपघात झाला. या अपघातामध्ये ३५ शिवभक्त जखमी झाले आहेत.

Accident : शिवभक्तांच्या वाहनाचा भीषण अपघात; ३५ जखमी
पाण्याचा फुगा बेतला जीवावर, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू

यापैकी १० जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येत आहे. तर वीस जणांना किरकोळ मार लागला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीनं जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मल्हारगड ते लोणावळा शिलाटणे येथे शिवज्योत घेऊन हे शिवभक्त निघाले होते. बेंगलोर मुंबई हायवेवर पोहचले असता टेम्पोला मागून कंटेनरची जोरात धडक बसली.

Accident : शिवभक्तांच्या वाहनाचा भीषण अपघात; ३५ जखमी
Nagaland : BJP बरोबर NCP सत्तेत येणार, कसं आहे विरोधक नसलेलं नवं सरकार?

अपघात घडल्याने घटनास्थळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अशात जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्याचे काम सुरू आहे. शिवजयंतीच्या दिवशीच अशी घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Accident : शिवभक्तांच्या वाहनाचा भीषण अपघात; ३५ जखमी
स्पॉन्सर नाही मिळाला म्हणून काय झाले...! WPL मध्ये बॅटवर लिहिले MSD O7, ठोकलं अर्धशतक
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com