पुणे -

भोसरी पोलिसांनी चार वाहन चोरांकडून 10 लाखांहून अधिक किंमतीच्या25 दुचाकी हस्तगत केल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला

अटक केली आहे तर तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. अटक केलेला गुन्हेगार नगर जिल्ह्यातील अकोलेतील राजूर परिसरातील आहे. त्याचे नाव अजित अमृत साबळे (वय 25, मु. मवेशी, पो. राजूर, ता. अकोले) असे आहे.

या टोळीने पुणे, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातून दुचाक्या चोरल्या ओहत. त्यापैकी 22 गुन्हे उघड झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून वाहन चोरीच्या घटना वाढल्या होत्या. त्यामुळे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सर्व पोलिस ठाणे आणि पथकांना सुचना दिल्या होत्या. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.