
पुणे | Pune
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पण विभागीय चौकशीत त्यांना स्वतःचं म्हणणं मांडण्याची मुभा मिळणार आहे. ऑन ड्युटी ड्रीम ११ हा ऑनलाइन गेम खेळणं त्यांना चांगलंच महागात पडलं आहे. अगदी आठवडाभरापूर्वी झेंडे यांनी ड्रीम ११ या ऑनलाइन गेमवर टीम बनवून दीड कोटींचं बक्षीस जिंकलं होतं. या गोष्टीची राज्यभरात चर्चा झाली होती.
झेंडेंच्या निलंबनाला त्यांनी केलेल्या दोन चुका कारणीभूत ठरल्या आहे. या दोन चुका इतक्या महागात पडल्या की करोडपती झालेल्या पोलीस उपनिरीक्षक झेंडेंना नोकरी गमवावी लागली आहे. वर्दीच्या वर्तणुकीला बाधा पोहचवल्याचा ठपका ठेवत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पहिली चूक वर्दीत ते ही ऑन ड्युटी ऑनलाईन गेमिंगमधून पैसे मिळवणं आणि दुसरी त्याच वर्दीत छाती ठोकपणे माध्यमांपुढं येऊन सांगणं हे वर्दीच्या वर्तणुकीला बाधा पोहचवणारे आहे, असे म्हणत कारवाई करण्यात आली आहे.
वर्दीच्या वर्तवणुकीला बाधा पोहचवल्याचा ठपका झेंडेंवर ठेवण्यात आलाय. पण विभागीय चौकशीत त्याला स्वतःचं म्हणणं मांडण्याची मुभा मिळणार आहे. क्रिकेट वल्ड कप मॅचवेळी झेंडेंनी ड्रीम ११ या ऑनलाइन गेममध्ये स्वतःची टीम लावली अन त्यात ती अव्वल ठरली. त्यामुळे झेंडे अवघ्या आठ तासांत करोडपती झाले.