पोलिस दलाचा कुटुंबप्रमुख म्हणून सार्थ अभिमान
महाराष्ट्र

पोलिस दलाचा कुटुंबप्रमुख म्हणून सार्थ अभिमान

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शेअर केला व्हिडिओ

Nilesh Jadhav

मुंबई | Mumbai

करोनाच्या संकटात पोलिस एका योध्या प्रमाणे लढत आहे. तसेच अनेक ठिकाणी गरजूंना मदत करतानाचे फोटोज्, व्हिडिओ सोशल मीडियावर येत आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या ट्विटर वर महाराष्ट्र पोलिसांसाठी एक व्हिडिओ शेअर केला आहे.

त्यांनी व्हिडिओ शेअर करत म्हंटले आहे, "कोविड-१९ च्या काळात पोलिसांनी आपल्या कर्तव्याच्या पलीकडे जाऊन केलेल्या कामांचे काही भावस्पर्श क्षण. #Covid19 विरुद्धच्या लढ्यात #महाराष्ट्र_पोलीस लढवय्ये शिलेदार ठरले आहेत. अनेक कामातून वर्दीतील संवेदनशीलता त्यांनी दाखवून दिली आहे. या लढ्यात महाराष्ट्र पोलिसांचे असणारे योगदान कधीही विसरता येणार नाही. त्यांच्या कार्याचा मला पोलीस दलाचा कुटूंबप्रमुख म्हणून सार्थ अभिमान आहे."

Deshdoot
www.deshdoot.com