कामगार वर्गाचे संरक्षण महत्त्वाचे - मुख्यमंत्री

नीती आयोगाची बैठक
कामगार वर्गाचे संरक्षण महत्त्वाचे - मुख्यमंत्री

मुंबई -

जय जवान, जय किसान यासोबतच जय कामगार अशी घोषणाही महत्त्वाची आहे. कामगार हा देशाचे अर्थचक्र चालवतो त्यामुळे गुंतवणुकीच्या

जोडीने रोजगार किती निर्माण होतो आणि या कामगार वर्गाचे संरक्षण यालाही तितकेच महत्त्व आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नीती आयोगाची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

कोविडचा लढा संपलेला नाही. आपणही व्हीसी वगैरेंच्या माध्यमातूनच भेटतो आहोत. कार्यालयीन वेळच्या बाबतीत पारंपरिक 10 ते 5 ही मानसिकता बदलून वेगवेगळ्या कार्यालयीन वेळांचं नियोजन करणं गरजेचं आहे त्यासाठी केंद्राने राष्ट्रीय धोरण आखावं असंही मुख्यमंत्री म्हणाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com